शेळी पालन कसे करायचे व त्यासाठी लागणारी माहिती पहा | Sheli Palan Mahiti Marathi - सरकारी योजना

शेळी पालन कसे करायचे व त्यासाठी लागणारी माहिती पहा | Sheli Palan Mahiti Marathi


शेतकरी मित्रांनो आज आपन पाहणार  शेळी पालन कसे करायचे

Sheli Palan - शेळी पालन 

भारत हा कृषी प्रधान देश आहे, बरेच शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत, भारतात शेळी व मेंढी पालन व्यवसाय हा शेतीला पुरक व्यवसाय आहे त्याला आपण जोड धंदा असे म्हणतो आणि शेळी व मेंढी पालन व्यवसाय किफायतशीर ठरलेला आहे. शेळी व मेंढी पालन हा व्यवसाय सध्या पारंपारिक पद्धतीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारित पद्धतीने केला जातो तसेच चांगले व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय किफायतशीर ठरू शकतो. बरेच शेतकरी छप्परातील, अर्ध बंधिस्त आणि बंधिस्त पद्धतीने शेळी व मेंढी पालन करतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारित पद्धतीने केल्यास फायदेशिर ठरते. 

शेतकरी मित्रांनो जर आपण (Sheli Palan Business) या व्यवसायाकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे शेळ्या व मेंढ्याचे व्यवस्थापन करणे, रोग नियंत्रण, पैदास, आहार व्यवस्थापन करणे गरजेचे आहे त्यामुळे हा व्यवसाय वाढण्यास मदत होऊ शकते. शेतकरी मित्रांनो आपण शेळी व मेंढी पालन या व्यवसायाकडे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून न बघता व्यवसायाच्या दृष्टीकोनातून बघणे आवश्यक आहे, कारण हा व्यवसाय मोठा नफा देणारा आहे.


 हा व्यवसाय पारंपारिक पद्धतीने किंवा सुधारित पद्धतीने केला असता महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वेळेचे व्यवस्थापन, रोग राई वर नियंत्रण, पैदास संगोपन, स्वछता, करडे व कोकरांचे संगोपन, पाण्याचे व खाद्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 

Goat Farming in India

या व्यवसायाची  सुरवात करताना बऱ्याच गोष्टींना समजून घेणे आवश्यक आहे.
 • भारतातील शेळ्या व मेंढ्यांच्या जाती 
 • शेळ्यांचे प्रथमोपचार 
 • शेळी व मेंढी साठी निवारा (Sheli Palan Shed)
 • शेळी व मेंढी पालनाच्या विविध पद्धती 
 • शेळी व मेंढी आजार व त्या वरील उपाय 
 • आहार व्यवस्थापन (Food Management)
 • शेळ्या व मेंढ्यामधील प्रजनन 
 • शेळ्या व मेंढ्यांचे प्रशिक्षण (Sheli Palan Training)
 • करडे व कोकरांचे संगोपन 
 • बंदिस्त शेळीपालन 
 • शेळ्या - मेंढयांचा विमा (Goat and Ship Insurance)
 • शेळ्यांची विक्री व वहातुक 
Sheli Palan Marathi

शेळ्यांच्या जाती - भारतातील देशी जातीच्या शेळया Indian Goat Breed

भारतामध्ये शेळ्यांच्या बऱ्याच जाती आढळून येतात, शेळी पालन हा व्यवसाय मांस उत्पादन व दूध उत्पादन यासाठी केले जाते. शेळ्यांच्या कांही प्रमुख जाती.

१) बीटल : (Beetal Goat) बीटल जातीच्या शेळ्या आकाराने लहान असतात. शिंगे उभी व वळलेली असतात. बोकडांना लांब दाढी असते व शेळ्यांना ती नसते विशेष म्हणजे या जातीत ठराविक एकच आढळुन येत नाही.
बीटल ह्या शेल्यास रंगाने तांबडे असुन त्यावर पांढरे ठिपके असतात. 

२) बारबेरी : (Barbari Goat) बारबेरी जातीच्या शेळ्यांचे पाय आखूड असतात, बारबेरी शेळ्या उत्तर प्रदेश मध्ये इटावा, इटारसी, मथुरा आणि आग्रा या भागात  येतात. बारबेरी शेळ्यांचे रंग पांढरा असून अंगावर काळे ठिपके असतात, ह्या शेळ्यांचे कान लहान असून उभे असतात.

३) अजमेरी ऊर्फ सिरोही : (Sirohi Goat) अजमेरी शेळ्यांना सिरोही असे हि म्हणतात. या शेळ्या राजस्थान मध्ये अजमेर व त्या लगतच्या भागात आढळतात. त्यांचा रंग गडद तपकिरी असतो. सिरोही या शेळ्या आकाराने मोठया असतात.

४) जमनापारी : (Jamnapari Goat) जमनापारी शेळ्यांचे लांब कान मुख्य वैशिष्ट आहे. तर नाक पोपटासारखी बाकदार असते. जमनापारी जातीच्या शेळ्या उत्तर प्रदेश प्रांतातील आहेत. जमनापारी जातीच्या शेळ्या आकाराने मोठी असून छान व रुबाबदार दिसते. जमनापारी शेळ्यांची जात सर्वात उंच समजली जाते. या शेळ्या रंगाने पांढऱ्या किंवा पांढऱ्या रंगावर तांबडे ठिपके असलेल्या आढळून येतात.    

५) मलबारी : (Malabari Goat) मलबारी ह्या शेळ्या केरळ राज्यात असतात. या शेळ्या दूध उत्पादनासाठी उपयुक्त आहे. मलबारी शेळ्यांचे कान लांब असतात. मलबारी शेळ्या दिसायला आकर्षक असतात. 

६) सुरती : (Surati Goat) सुरती गुजरात राज्या बरोबर महाराष्ट्रात धुळे आणि जळगाव जिल्ह्यात आढळून येतात. सुरती शेळ्यांचे रंग पांढरे असते व कान  लांबट आणि रुंद असतात. 

७) उस्मानाबादी : (Osmanabadi Goat) उस्मानाबादी शेळ्या मांस उत्पादनासाठी उपयुक्त शेळी जात आहे. उस्मानाबादी शेळ्या महाराष्ट्र राज्यात आढळतात, मराठवाडयातील उस्मानाबाद, लातुर या जिल्ह्यात  ह्या शेळ्या आढळून येतात व तसेच इतर जिल्ह्यात हि मोठया प्रमाणात आढळतात. उस्मानाबादी शेळ्या संपूर्ण काळ्या रंगाच्या असतात व कानावर लहान पांढरे ठिपके असतात. या शेळ्या आकाराने मोठ्या असतात. उस्मानाबादी शेळ्यांचे शिंगे काळ्या, पांढऱ्या तांबडया असतात. यात बिनशिंगी किंवा होंड्या प्रकारच्या शेळ्या देखील आढळून येतात. उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याने महत्वाची मानली जाते. 

८) संगमनेरी : (Sangamneri Goat) संगमनेरी शेळ्या महाराष्ट्र राज्यात आढळतात, अहमदनगर व पुणे  या जिल्ह्यात  ह्या शेळ्या आढळून येतात. या शेळ्या आकाराने मध्यम असतात. संगमनेरी जातीच्या शेळ्या मांस उत्पादनासाठी उपयुक्त शेळी जात आहे. या शेळ्यांचे रंग काळ्या, पांढऱ्या व तांबडया रंगाचे असतात व अंगावर ठिपके असतात.  

९) बोअर : (Boer Goat) बोअर शेळी जात हि मूळ दक्षिण आफ्रिकेतील आहे. बोअर जातीच्या शेळ्या जगात मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. या शेळ्यांचे रंग पांढरे व तांबडे असते. हि जात अतिशय झपाट्याने वाढते व लवकर वयात येते.    

१०) मारवाडी : (Marwari Goat) मारवारी जातीच्या शेळ्या राजस्थान राज्यात आढळतात. या शेळ्या मांस उत्पादनासाठी उपयुक्त आहेत. या शेळ्या काटक असतात व या शेळ्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते. या शेळ्या आकाराने मध्यम असतात आणि या शेळ्यांचे कान पसरट असतात.  

वरील कांही महत्वाच्या भारतातील शेळ्यांच्या जाती आहेत, या जाती दूध उत्पादनासाठी, मांस उत्पादनासाठी महत्वाच्या जाती आहेत.

विदेशी जातीच्या शेळ्या 

१) सानेन 
२) टोगेन बर्ग 
३) अँग्लो न्यूबियन 

आपण या Blog मध्ये Sheli Palan या विषयावर माहिती बघितली आहे. शेळी पालन व्यवसाय (Sheli Palan Business) व शेळ्यांच्या प्रमुख जाती देशी व विदेशी शेळी जात या बद्दल Sheli Palan Mahiti, शेळी पालन शेतीला पूरक व्यवसाय, शेळी पालनाच्या पद्धती या विषयी माहिती पहिली आहे.

आपल्या सर्वांचे धन्यवाद .

No comments:

Post a Comment